
श्री गजलक्ष्मी पथक, पुणे
श्री गजलक्ष्मी पथकाची स्थापना ही २००१ साली मा. श्री. केतन देशपांडे यांनी केली. पुण्यामधील मित्र परिवार, सहकारी तसेच ढोल-ताशा प्रेमी सोबत येऊन पथकाची स्थापना झाली. 'गज' म्हणजेच गणेशाचे एक रूप आणि 'लक्ष्मी' असे मिळून पथकाला 'श्री गजलक्ष्मी' नाव देण्यात आले. २ ढोल आणि १ ताशा ने सुरुवात होऊन आता पथकाकडे १५१ ढोल आणि ६१ ताशा तसेच ध्वज आणि झांज आहेत. यंदाचे वर्ष २४ वे असून, २५ व्या म्हणजेच रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये यशस्वी पदार्पण करीत आहे. सन २००१ पासून २0२४ पर्यंत १०००० हुन अधिक युवक पथकशी जोडले गेले आहेत. पथक पहिल्यापासूनचं पारंपरिक वादन आणि आवाज यावरती लक्ष केंद्रित करीत आले आहे आणि त्याचबरोबर दरवर्षी वेगवेगळ्या चाली आणि ठेके गणेशोत्सवात बसवले गेले आहेत. पथकामध्ये जे नवीन वादक जोडले जातात त्यांच्यावरती वादनरूपी संस्कार घडवले जातात, ठेका बरोबरच थापी तेवढीच महत्वाची आणि यावरती वादनाची गुणवत्ता ठरते हे दरवर्षी वादकांना शिकवले जाते. यामुळेच, 'शिस्तप्रिय पथक' आणि 'आवाजाचा राजा' म्हणून पथकाची ओळख निर्माण झाली आहे. यातूनच, पथकाचा भजनी ठेका, मोरया चाल, महाकाल, गावठी, नाशिक ढोल अशा चालींसाठी प्रसिध्द आहे. गणेशोत्सवादरम्यान समाजकार्यात कार्यरत राहत श्री गजलक्ष्मी ट्रस्ट हे विविध संस्थांना जोडून 'परंपरेसोबतच कर्तव्य' ही भूमिका बजावत आहे. श्री गजलक्ष्मी गेले १६ वर्ष मानाचा चौथा (महागणपती) श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि हुतात्मा बाबू गेनू मंडळ (नवसाचा गणपती) विसर्जन मिरवणुकीत वादन करीत आहोत. मोरया गोसावी भाद्रपद-मोरगाव यात्रा मध्ये पथक गेली ११ वर्षे वादन करीत आहे. याचबरोबर, पुण्यातील मार्केटयार्ड, अकरा मारुती, हत्ती गणपती, दगडूशेठ दत्तमंदिर, चतु:श्रुंगी देवस्थान, कल्याणचा सुभेदार वाडा, सिनेस्टार सलमान खान, उपसभापती मा. वसंतराव डावखरे, कोल्हापूर आदी ठिकाणी वादन केले आहे.